कोल्हापूर – डी.वाय. पाटील ग्रुप आणि पाटाकडील तालीम मंडळ आयोजित कै.पांडबा जाधव आणि कै. रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ सतेज चषक 2025 स्पर्धेत खंडोबा तालीम विरुद्ध पीटीएम यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात पीटीएमने खंडोबावर 4 – 2 गोल फरकाने विजय मिळवून सतेज चषक उंचावला तर खंडोबा तालीम संघाला उपविजेतेपद मिळाले.

यावेळी वेस्टर्न फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार जयंत आसगावकर, शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख विजय देवणे, भारतीय फुटबॉल संघाचे माजी प्रशिक्षक मंदार ताम्हणे, डॉ. भरत कोटकर, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह महेश उत्तुरे, संजय मोहिते, राहुल माने, अर्जुन माने, प्रतापराव जाधव, ईश्वर परमार, डॉ. संदीप नेजदार, रियाज सुभेदार तसेच पीटीएम मंडळाचे राजेंद्र ठोंबरे, संपत जाधव,संदीप सरनाईक, सुरेश ढोणुक्षे, माणिक मंडलिक यांच्यासह पीटीएम आणि केएसएचे पदाधिकारी आणि फुटबॉल शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.