शेतकऱ्यांचा रोष ओढावून घेऊ नका! आ. सतेज पाटील यांचा आझाद मैदानावरील शक्तीपीठ विरोधी आंदोलनात सरकारला इशारा

मुंबई: नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काढलेल्या विधानसभेवरील धडक मोर्चाच एकच जिद्द दाखवून शक्तीपीठ रद्दची मागणी केली. आज यासंदर्भात महाविकास आघाडीच्या सहकार्यांनीही विधीमंडंळात याबद्दल आवाज उठवून शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेऊ नका असा इशारा दिला.आमदार सतेज पाटील यांच्या निवेदनात सरकारला शक्तीपीठबाबत चुकीची माहीती मिळत असून त्यातून गैरसमज निर्माण होत आहेत. शक्तीपीठला सर्वच शेतकऱ्यांचा कडाडून विरोध असल्याचे ठामपणे विधीमंडळात मांडले.

 

दरम्यान, आंदोलनस्थळी पुन्हा शेतकऱ्यांशी बोलताना विधीमंडळात शक्तीपीठ रद्द करण्याची मागणी मोठ्या ताकदीने मांडल्याचे सांगितले. सरकार हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करत असले तरी आपण सर्व शेतकऱ्यांनी शक्तीपीठ संघर्ष कृती समितीच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले.

शेतकऱ्यांना नको असलेला शक्तिपीठ महामार्गाचा सरकारने अट्टाहास सोडावा. विकास साधायचा असेल तर मराठवाड्याला पाणी द्या, शक्तीपीठ मंदिरांना निधी द्या. पण सरकारची सध्याची मानसिकता पाहिली तर आता हे आंदोलन अधिक तीव्र करण्याची आणि त्यासाठी तालुका तालुक्यात बैठका घेण्याची गरज असल्याचं सांगितले. आता ही लोकचळवळ झाली पाहिजे अशी भूमिका मांडली.

आजच्या या आंदोलनाला महाविकास आघाडील प्रमुख सर्वच नेत्यांनी आणि सहकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना बळ दिले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेचे गटनेते विजय वड्डेटीवार, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार विश्वजित कदम, राजेश विटेकर, सचिन अहिर, कैलास पाटील, राजू नवघरे, दिलीप सोपल, प्रवीण स्वामी, जयंत आसगावकर, अरुण लाड, माजी आमदार संजयबाबा घाटगे, के पी पाटील, पृथ्वीराज साठे, विजय देवणे, संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, राहुल देसाई, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चुचेकर, अमरीश घाटगे सत्यजित जाधव, जीवन पाटील, उबाठा शिवसेनचे प्रकाश पाटील, भारत पाटील- भुयेकर, विक्रांत पाटील- किणीकर यांच्यासह राज्यभरातील विविधी संघटना आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.