कोल्हापूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भुयेवाडी इथल्या श्री भैरवनाथ सहकारी दूध व्यवसायिक संस्थेच्या वतीने महिला सभासदांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता. या समारंभाची सुरुवात गोमातेच्या पूजनाने झाली. प्रमुख अतिथी म्हणून शौमिका महाडिक या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित महिला सभासदांना भेटवस्तूंचे वाटपही करण्यात आले.
यावेळी गोकुळ दुध संघाचे संचालक अजित नरके, छ.राजाराम साखर कारखान्याचे माजी संचालक बाबासो पाटील,भैरवनाथ दूध संस्थेचे चेअरमन सरदार खाडे,भैरवनाथ दूध संस्थेचे व्हा.चेअरमन धनाजी नरंदे,भुयेवाडी गावच्या उपसरपंच अस्मिता पाटील, भा.ज.पा.महिला मोर्चा उपाध्यक्षा भारती व्हनागडे, विशाल पाटील व इतर मान्यवर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, दूध उत्पादक शेतकरी सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.