प्रशांत कोरडकरला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा झटका !

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरडकर यांच्या जामीन विरोधात सुनावणीला सुरुवात झाली आहे. या सुनावणी दरम्यान प्रशांत कोरडकर अद्याप कोर्टात हजर नसल्याची माहिती सूत्राकडून समोर येत आहे.

 

 

कोरटकरच्या जामीनला कोल्हापूर पोलिसांनी विरोध दर्शवला आहे.जामीन रद्द करण्याची मागणी कोल्हापूर पोलिसांनी केली आहे. या संदर्भातील याचिका पोलिसांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

प्रशांत कोरडकर यांनी इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या बद्दल वक्तव्य केले होते त्यामुळे राज्य सरकारने कोरडकर विरोधात याचिका दाखल केली ज्यावर आज (11 मार्च) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने कोरड कडला मोठा झटका दिला आहे कोल्हापूर सुत्र न्यायालयाचे निरीक्षण काढून टाकण्याचे महत्त्वाचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत प्रशांत कोरकडचा मोबाईल हँग झाल्याचे निरीक्षण कोल्हापूर सत्र न्यायालयाने नोंदवले होते.