कोल्हापूर:महायुती सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या घोषणांचा परिपाक आहे. असा टोला आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकार वर केला.
या अर्थसंकल्पात कोल्हापुरला ठेंगा दाखवला आहे. अंबाबाई मंदिराचा १४०० कोटी रुपयांचा विकास आराखडा, जोतिबा विकास प्राधिकरण आराखड्यासाठी एक रुपयाचीही तरतूद केली नाही. निवडणुकांपुर्वी विकासाचे मृगजळ दाखवणाऱ्या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्राच्या जनतेची घोर निराशा केली आहे. या अर्थसंकल्पातून लाडक्या बहिणींचा, कर्जाखाली पिचलेल्या शेतकऱ्यांचा आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विश्वासघात केला आहे. लाडक्या बहिणींचा २१०० रुपयांचा वायदा, ग्रामीण महाराष्ट्राचा विकास, राज्यावर वाढत चाललेला कर्जाचा डोंगर, महिला सुरक्षेबाबत ठोस उपाय आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था, अशा अनेक मुद्द्यांना महायुती सरकारने पद्धतशीर बगल दिली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे फसव्या घोषणा आणि दिशाभूल करणाऱ्या योजनांचा परिपाक आहे.असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.