दूरशिक्षण केंद्रात इतिहास स्वयं अध्ययन साहित्य कार्यशाळा 

कोल्हापूर :  शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रात बी.ए.भाग २ सत्र १ व २ च्या इतिहास विषयाच्या स्वयं अध्ययन साहित्य निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. इतिहास अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा.डॉ.चंद्रवदन नाईक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,इतिहास स्वयं अध्ययन साहित्य गुणात्मक व आशय पूर्ण तयार करुन वेळेत जमा करावेत.

 

 

तसेच प्र.संचालक डॉ.के.बी.पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांना दर्जेदार व संशोधनात्मक स्वयं अध्ययन साहित्य देण्यासाठी घटक लेखकांनी प्रयत्न करावेत.ते तयार करताना मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे. यावेळी उपकुलसचिव श्री व्ही.बी.शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित घटक लेखकांना लेखनासाठी घटक वाटप करण्यात आले.शिवाय नव्याने तयार करण्यात आलेल्या एम. ए. भाग २ सत्र ४ च्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा इतिहास या स्वयं अध्ययन साहित्याची प्रत घटक लेखक डॉ.संतोष जेठीथोर यांना डॉ. नाईक यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी स्वागत व प्रास्ताविक डॉ.नितीन रणदिवे यांनी केले.तर आभारडॉ.मुफिद मुजावर यांनी केले.