कोल्हापूर : महानगरपालिका घरफाळा विभागाच्यावतीने शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना घरफाळा विभागमार्फत जप्ती नोटीस लागू करण्यात आल्या आहेत. परंतू तरी देखील काही मिळकतधारकांनी आपली थकीत रक्कम जमा केली नसलेने अशा थकबाकीदारांवर घरफाळा विभागाकडून मिळकत सील करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
त्यानुसार घरफाळा विभागीय कार्यालय क्र.4 अंतर्गत आर.टी.ओ.ऑफीस परिसरातील घरफाळा वसूलीकामी दोन मिळकतींवर सीलची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रकांत दत्तात्रय भोसले यांची रु.77 हजार 297 रुपये व महमंद इक्बाल नुसलभाई मुल्ला यांची रु.99 हजार 843 रुपये अशी एकूण 1 लाख 77 हजार 140 रुपये इतकी थकबाकी असलेने सदरचे दुकानगाळे सील करण्यात आले आहे. तसेच अन्य तीन मिळकती सील करीत असताना मिळकतधारकांनी आपली थकीत रक्कम समक्ष जागेवर रु.6 लाख 90 हजार इतकी रक्कम भरणा केली आहे.
तरी शहरातील ज्या थकबाकीदारांनी अद्यापही आपल्या घरफाळ्याची थकीत रक्कम भरणा केलेली नाही त्यांनी आपला थकीत घरफाळा भरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे. अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी नुसार सदरची मिळकत सील किंवा मिळकतीवर बोजा नोंद करण्याची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.