‘शिवस्पंदन’च्या अखेरच्या दिवसावर तंत्रज्ञान अधिविभागाचे वर्चस्व

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवामध्ये अखेरच्या पाचव्या दिवशी क्रिकेटसह बास्केटबॉलमध्ये तंत्रज्ञान अधिविभागाच्या विद्यार्थिनींनी विजेतेपद मिळविले.

 

 

सकाळच्या सत्रात झालेल्या महिलांच्या क्रिकेटमधील अंतिम सामन्यात गणित अधिविभागावर मात करीत तंत्रज्ञान अधिविभागाने प्रथम क्रमांक मिळविला. गणित अधिविभागाला द्वितीय आणि नॅनो सायन्स व तंत्रज्ञान अधिविभागाने तृतीय क्रमांक पटकावला.

महिलांच्या बास्केटबॉल स्पर्धेतही तंत्रज्ञान अधिविभागाने प्रथम क्रमांक मिळविला. गणित अधिविभागाने द्वितीय तर क्रीडा अधिविभागाने तृतीय क्रमांक प्राप्त केला.

महिलांच्या रस्सीखेच स्पर्धेत नॅनो सायन्स व तंत्रज्ञान अधिविभागाने प्रथम, क्रीडा अधिविभागाने द्वितीय आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट (वाय.सी.एस.आर.डी.)ने तृतीय क्रमांक पटकावला. पुरुषांच्या रस्सीखेच स्पर्धेत तंत्रज्ञान अधिविभागाने प्रथम, वाय.सी.एस.आर.डी.ने द्वितीय आणि क्रीडा अधिविभागाने तृतीय क्रमांक पटकावला.

अॅथलेटिक्स स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे अनुक्रमे असा:

४ X १०० रिले – क्रीडा अधिविभाग, तंत्रज्ञान अधिविभाग आणि जीवशास्त्र अधिविभाग

लांब उडी (महिला)- देवयानी सबनीस (तंत्रज्ञान अधिविभाग), अंजली लोहार (अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान), नंदिनी कुंभार (गणित)

४०० मी. (महिला)- मनीषा पाटील (क्रीडा), अनुष्का भोसले (गणित), अनुष्का पाटील (क्रीडा)

१०० मी. (पुरूष)- आर्यन शेजाळ (क्रीडा), क्रिश पोतदार (क्रीडा), नड्लान्झी बोनगिनकोसी मायकल (वाणिज्य व व्यवस्थापन)

शिवस्पंदन क्रीडा महोत्सव यशस्वीरित्या व शिस्तबद्धरित्या आयोजित करण्यामध्ये सहाय्य करणाऱ्या सर्व अधिविभाग प्रमुखांसह शिक्षक, संचालक व विद्यार्थ्यांचे क्रीडा व शारीरिक संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी अभिनंदन केले आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डॉ. राजाराम गुरव, डॉ. केशव राजपुरे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. कैलास सोनावणे, डॉ. प्रवीणकुमार पाटील, डॉ. शशीभूषण महाडिक, डॉ. वाय. एन. कांचे, डॉ. तृप्ती करीकट्टी, डॉ. राहुल माने, डॉ. ज्योती जाधव, डॉ. आण्णा गोफणे, डॉ. नवनाथ वलेकर, डॉ. एन. डी. पाटील, डॉ. राजेंद्र रायकर, प्रा. किरण पाटील, डॉ. राम पवार, डॉ. धनंजय पाटील, डॉ. निलेश पाटील, प्रा. एन. आर. कांबळे, डॉ. विक्रम नांगरे- पाटील, सुभाष पवार, सुचय खोपडे, डॉ. प्रशांत पाटील, प्रा. मनीषा शिंदे, प्रदीप हंकारे, विजय कांबळे, आनंदा तळेकर, सुनील देसाई, शरद चव्हाण, तौहीद मुल्ला, शुभम काशीद, संग्राम गुरव, आकाश पाटील आदींनी परिश्रम घेतले.