मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापुरातील विन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा

कोल्हापूर: कोल्हापुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर संतोष प्रभू आणि सुजाता प्रभू यांनी नव्याने सुरु केलेल्या विन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला.

 

 

मेंदू विषयक आजारांवरील उपचार आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आता कोल्हापुरात अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार आहेत.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर, पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, व्यवस्थापकीय संपादक योगेश जाधव, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, आमदार अमल महाडिक, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

🤙 9921334545