हुपरी येथील जवाहर सहकारी बँकेचे जनता बँकेत विलीनीकरण

कुंभोज ( विनोद शिंगे)
सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखाली उदयास आलेल्या व माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे यांच्या संकल्पनाच्या माध्यमातून सहकारी बँकिंग क्षेत्रात लोकाभूमिक झालेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेमध्ये बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांच्या प्रयत्नाने हुपरी येथील जवाहर सहकारी बँकेचे विलीनीकरण करण्यास रिझर्व्ह बँकेकडून परवानगी मिळाल्या बद्दल बँकेचे सर्व संचालक मंडळ व अधिकारी, कर्मचारी वर्ग यांच्याकडून बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांचा सत्कार करून अभिनंदन केले.

 

तसेच सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे यांची बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे, व्हा. चेअरमन संजयकुमार अनिगोळ बँकेचे, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चौगुले, सी ई ओ संजय शिरगावे व सर्व संचालक मंडळानी भेट घेऊन त्यांना विलिनीकरणाची माहिती देऊन आशीर्वाद घेतले.