कोल्हापूर : शेतकरी सन्मान निधीचा 19 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारच्या भागलपूर इथून एका जाहीर कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात यावेळी 6000 रुपये जमा होणार आहेत. देशातील 13 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
भागलपूर जिल्ह्याचे उपकृषी संचालक विकेश पटेल यांनी सांगितलं की, ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही जनसेवा केंद्रांमध्ये जाऊन शेतकरी नोंदणी केलेली नाही. त्यांना हा हप्ता मिळू शकणार नाही. या नोंदणीसाठी अजूनही शेतकऱ्यांना एक आठवडा बाकी आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे त्यांनी ती त्वरीत करून घेण्याकरिता आपला मोबाइल नंबरही देणं गरजेचं असल्याचही त्यांनी सांगितलं.