आ. अमल महाडिक यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लायब्ररी उभारावी यासाठी दिले निवेदन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत आणि सुसज्ज लायब्ररी तसेच डेबोर्डिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोल्हापुरातील रमण मळा इथल्या ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क येथे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लायब्ररी उभारावी अशा आशयाचे निवेदन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आमदार अमल महाडिक यांनी दिले.

 

 

अनेक हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना परिस्थितीअभावी स्पर्धा परीक्षा देता येत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका वरदान ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. आदरणीय दादांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर कार्यवाही केले जाईल असा विश्वास दिला.

🤙 9921334545