कोल्हापूर :(पांडुरंग फिरींगे)
विवेकानंद महाविद्यालयात 7 फेब्रुवारी जागतिक कॅन्सर दिन साजरा करण्यात आला. बदलती जीवनशैली, बदलत चाललेला आहार आणि जगण्याच्या पद्धती या कॅन्सर सारख्या आजारास निमंत्रण देत आहेत . विकसित देशात कॅन्सर रुग्णांचे प्रमाण जास्त, मात्र मृत्यू दर कमी आणि भारतासारख्या देशात कॅन्सर रुग्णांचे प्रमाण कमी मात्र मृत्यूदर जास्त हे फक्त चुकीच्या जीवनशैलीमुळे होत आहे. असे मत प्रदीप काकडे आरंभ पॅलीऐटीव्ह कॅन्सर केअर सेंटरचे प्रमुख यांनी विवेकानंद महाविद्यालय ते कलेक्टर ऑफिस दरम्यान आयोजित केलेल्या प्रबोधन पर रॅली प्रसंगी मांडले.
सदरच्या रॅलीने अहिल्यानगर पासून ते कोल्हापूर पर्यंत 850 किलोमीटरचे अंतर प्रबोधनातून पूर्ण केले .सदरच्या रॅलीचे सांगता जिल्हाधिकारी कार्यालयात प्लास्टिक वापरावर खाण्यापिण्याच्या पदार्थामधून बंदीचा निवेदनातून झाली. रॅलीचे आयोजन कॉलेजचे प्राचार्य आर आर कुंभार, आय क्यू ए सी प्रमुख डॉ श्रुती जोशी, ज्युनिअर आर्ट्स कॉमर्स विभाग प्रमुख प्रा शिल्पा भोसले , मेजर सुनिता भोसले, लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा प्रा. यु. एच. तिजाईकर, प्रा. पी. वाय. राठोड, प्रा. पी.आर. बागडे , प्रबंधक रघूनाथ जोग यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.जिल्हाधिकारी कार्यालयात काजल टोपले या ब्लड कॅन्सरवर मात केलेल्या मुलीचा विशेष सत्कार करण्यात आला . सदरच्या रॅलीसाठी एनसीसी, एनएसएस आणि ज्युनिअर आर्टस विभागातील विद्यार्थी उपस्थित होते