कोल्हापूर : खिद्रापूर येथे उर्दू विद्यामंदिर शाळेचा विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक व राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार कार्यक्रमासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहिले.
यावेळी आमदार यड्रावकर म्हणाले, मी सर्वप्रथम या नेत्रदीपक कामगिरीबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने, परिश्रमाने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांची जिज्ञासा आणि नवीन गोष्टी शिकण्याची तळमळ खरोखरच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांच्या या यशात त्यांच्या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ मार्गदर्शन केले नाही, तर त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अथक प्रयत्न केले.राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा व मला विश्वास आहे की आपले विद्यार्थी राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनातही उत्कृष्ट कामगिरी करतील आणि आपल्या तालुक्याचे नाव रोशन करतील.
यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ.मीना शेंडकर,जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी मुसा सुतार, गटशिक्षणाधिकारी सौ.भारती कोळी, दीपक कामत,ओमासे साहेब,रियाज चौगुले,माजी सरपंच हैदरअली मोकाशी,मुस्ताक अहमद पटेल सर, माजीद पटेल सर,मठपती सर,सुनील एडके,दिलीप शिरढोने,अशपाक ढालाईत,पूजा पाटील,हिदायत मुजावर,अमित कदम,रावसाहेब रायनाडे उपस्थीत होते.