पन्हाळा –
कोतोली पैकी भाचरवाडी तालुका पन्हाळा येथील कुस्ती 🤼♂️ या खेळामध्ये ऐतिहासिक अशी कामगिरी करणारा खेळाडू अमृत सर्जेराव रेडकर यांनी जयपुर राजस्थान येथे झालेल्या ओपन सीनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले.
भाचरवाडी येथील पैलवान अमृत रेडेकर यांनी लहान वयात कुस्ती क्षेत्रात भाचरवाडीचे नावलौकिक मिळविला आहे.अमृताचे वडील हमाली करुन मुलग्याला पैलवान केले. अमृत रेडेकर यांनी ओपन सीनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेमध्ये यश संपादन केले.याबद्दल रेडेकर यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जातं आहे. सध्या ते शासकीय सेवेत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.