प्रामाणिक काम करणा-याच्या अधिका-याच्या पाठीवर प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांची शाब्बासकीची थाप

कोल्हापूर  : महापालिकेत प्रामाणिक व चांगले काम करणा-या अधिकारी व कर्मचा-यांच्या माठीमागे प्रशासक के.मंजूलक्ष्मी या कायम उभ्या असतात. याची प्रचित आज विभागीय कार्यालयातील एका निवृत्त होणाऱ्या अधिका-याला आली. राजारामपुरी विभागीय कार्यालयाचे उप-शहर अभियंता आर.के.पाटील हे आज वयोमानानुसार महापालिकेच्या सेवेतून निवृत्त होत आहेत.

 

प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांना आज सकाळी फिरती करताना उप-शहर अभियंता आर.के.पाटील हे निवृत्त होणार असलेचे समजताच समक्ष त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उप-शहर अभियंता आर.के.पाटील यांनी आपण आजपर्यंत चांगले काम केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. कारण प्रत्यक्ष प्रशासक के.मंजूलक्ष्मी आज त्यांच्या कार्यालयात आल्याने त्यांना अत्यंत सुखद धक्का मिळाला. त्यांनी महापालिकेत गेले 34 वर्षे काम केले आहे.

महापालिकेच्या कामामध्ये स्वतला वाहून घेणार कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. प्रामुख्याने आर.के.पाटील यांनी पर्यावरण, पाणी पुरवठा-ड्रेनेज, नगररचना, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा वेगवेगळया विभागांत चांगले काम केले आहे. यावेळी पंचगंगा प्रदूषण असो, पूरपरिस्थती असो, पाणी वितरण, ड्रेनेज व्यवस्था असो अशा विविध क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांना प्रशासनाकडून जादा इंन्क्रीमेंट व विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. आजही असे चांगले काम करणारे अधिकारी/कर्मचारी महापालिकेत आहेत जे आपल्या घरच्यापेक्षा संस्थेचा व शहरवासियांचा विचार करतात.