हस्तकला व हात मागावरती बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन म्हणजे एक व्यवसायिक परवनी-खा.धनंजय महाडिक

कुंभोज  (विनोद शिंगे)
राजारामपुरी 8 वी गल्ली, भारत हौसिंग सोसायटीच्या सभागृहामध्ये केंद्र सरकार वस्त्र मंत्रालय व हस्तकला आयुक्त कार्यालय यांच्या वतीने कोल्हापुरातील राजारामपुरी येथे गांधी शिल्प बाजार म्हणजेच हस्तकला व हात मागावरती बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन खा.धनंजय महाडिक यांनी केले. यावेळी तेथील कारागीर आणि विक्रेत्यांशी सवांद साधला. तसेच हस्तकलेविषयी माहिती जाणून घेतली.

 

 

देशभरातील कारागिरांना व्यासपीठ मिळावं. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी बाजारपेठ मिळावी आणि कलेला चालना मिळावी या उद्देशाने आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून जिल्हा स्तरावर गांधी शिल्प बाजार आणि हस्तशिल्प प्रदर्शन भरवण्यात आले आहे. आगामी काळात कारागिरांसाठी क्लस्टर योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणार तसेच कारागीर पुरस्कार पुन्हा सुरू करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांकडे करू असा विश्वास दर्शविला. याप्रसंगी खास सेलिब्रिटींसाठी बनवलेल्या आणि जीआय टॅग प्राप्त कोल्हापुरी चप्पल्स लॉन्चिंग केले.

4 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये 29 राज्यातील 40 स्टॉल्स लावले आहेत. त्यामध्ये कोल्हापुरी चप्पल, वारली पेंटिंग, पैठणी, सोलापुरी चादर यांच्यासोबत आर्ट मेटल वेअर, बिट्स क्राफ्ट, केन आणि बांबू उत्पादन, कार्पेट, शंख शिंपले, भाहुल्या आणि खेळणी, भरतकाम आणि क्रोशाच्या वस्तू ,काच, गवत ,पान, फायबर पासून बनवलेल्या वस्तू, साड्या, कपडे, स्कार्फ, हस्तकलेच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी, तंजावर पेंटिंग, लाकडी वस्तू, छत्तीसगडच्या डोकरा कास्टिंग सह विविध राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू या प्रदर्शनात आहेत. हे प्रदर्शनात उपलब्ध आहेत. तरी कोल्हापूरवासियांनी या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी व हस्तकलेच्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू खरेदी कराव्यात असे आवाहन यावेळी केले.

यावेळी यशोवर्धन बारामतीकर, राजेंद्र शिंदे, आकाश मुळीक, अनिल कुमार बिन उपस्थित होते.