कोल्हापूर : श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर यांच्या 106 व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त श्री सद्गुरूदादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठानकडून सामाजिक कार्यकर्त्या सुमेधा चिथडे यांना आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत ‘माऊली आनंदी’ पुरस्काराने विश्वपंढरी येथे गौरवण्यात आले.
भारतीय सैनिकांच्या कल्याणासाठी, पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुमेधा चिथडे यांनी ‘सिर्फ’ संस्थेच्या माध्यमातून केलेले काम अतुलनीय आहे. देशाचे संरक्षण करणाऱ्या व्यवस्थेची सुमेधा ताईंनी केलेली सेवा पहाता अशा निस्वार्थ वृत्तीने काम केल्यास देश पुढे नक्कीच जाऊ शकतो. त्यांच्या समाजसेवेचा आणि देशप्रेमाचा गौरव माझ्या उपस्थितीमध्ये होणे अभिमानास्पद आहे.
यावेळी श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय आनंदनाथ सांगवडेकर, सेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आक्कासाहेब सांगवडेकर, रामराया सांगवडेकर, श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालयाचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर, भावना सांगवडेकर, सामाजिक, शैक्षणिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.