प्रशासकांच्या बैठकीला लेट येणा-या 11 अधिकारी-यांचे अर्धा दिवसाचे वेतन कपात

कोल्हापूर:  प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी  आयुक्त कार्यालयात सर्व अधिकारी व खातेप्रमुखांची आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी बैठकीला अनुपस्थित असलेल्या तसेच वेळाने येणा-या 11 अधिका-यांचे अर्धा दिवसाचे वेतन कपात केले. यामध्ये तसेच छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये फिरती करताना प्राथमिक शिक्षण समिती, विवाह नोंदणी व विधी विभागामधील 8 कर्मचारी जागेवर नसलेचे प्रशासकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या कार्यालयातील जागेवर अनुपस्थित असलेल्या 8 कर्मचा-यांचेही अर्धा दिवसाचे वेतन कपात करण्यात आले.

 

 

 

यावेळी सहा.आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उप-शहर अभियंता सुरेश पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार उपस्थित होते.

🤙 9921334545