शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधींसह हुतात्म्यांना अभिवादन

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज सकाळी ११ वाजता दोन मिनिटे मौन व स्तब्धता पाळून महात्मा गांधी यांना तसेच हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

विद्यापीठातील सर्व प्रशासकीय कक्ष तसेच विविध अधिविभागांत महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रशासनातर्फे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीवरुन सकाळी ठीक १०.५९ वाजता भोंगा वाजविण्यात आला. त्यानंतर ११ वाजता सर्वांनी आपापल्या जागी स्तब्ध उभे राहून दोन मिनिटे मौन पाळून महात्मा गांधी यांच्यासह हुतात्म्यांचे स्मरण केले.

🤙 9921334545