कोल्हापूर –
जिल्हा परिषद कोल्हापूर कडील सन 2024-25 च्या वार्षिक क्रीडा स्पर्धा दिनांक 10 जानेवारी पासून सुरु झाल्या आहेत. दिनांक 29 जानेवारी, 2025 रोजी जिल्हा परिषद कोल्हापूर कडील कागलकर हाऊस येथे अधिकारी व कर्मचारी यांच्या कॅरम स्पर्धा पार पडल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने स्पर्धेचे उदघाटन अति. मुख्य कर्यकारी अधिकारी संतोश जोशी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामन्य प्रशासन मनीषा देसाई यांच्या हस्ते झाले.
12 तालुके व मुख्यालयातून महिला, पुरष व कंत्राटी कर्मचारी असे एकूण 380 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. सदरच्या स्पर्धा नियोजक म्हणून उदय गोडवे, अजय शिंदे, जुबेर मोमीन , प्रसाद बोरकर, प्रज्योत कुंभार, स्वप्निल पाटील, सागर जाधव यांनी काम पाहिले.