चौगुले महाविद्यालयाला नॅक अधिकारी यांनी दिली भेट

पन्हाळा –

श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथे नॅक समिती,बेंगलोर यांनी बुधवार दिनांक २२/०१/२०२५ व गुरुवार दिनांक २३/०१/२०२५ रोजी भेट दिली समितीचे अध्यक्ष म्हणून स्कूल ऑफ केमिस्ट्री सी.यु.सी.सेंट्रल विद्यापीठ,हैदराबाद (तेलंगणा) येथील प्रोफेसर डॉ.ललिता गुरुप्रसाद समन्वयक म्हणून विश्वभारती शांतीनिकेतन,पश्चिम बंगाल येथील इंग्रजी विषयाचे प्रोफेसर डॉ.अमरीत सेन तर सदस्य म्हणून केरळ येथील प्रोफेसर डॉ.प्राचार्य गिल्सन जॉन यांनी काम पाहिले.

 

 

त्यांनी कॉलेजमधील ऑफिस कामकाज,ग्रंथालय विभाग,एन.एस. एस.विभाग,एन.सी.सी.विभाग,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,समुपदेशन केंद्र, क्रीडा विभाग,क्रीडांगण,सांस्कृतिक विभाग तसेच बी.ए.भाग एक,दोन व तीन,एम.ए भाग एक व दोन विभाग व बी.एस्सी भाग एक,दोन व तीन व एम.एस्सी भाग एक व दोन विभागाला भेट देऊन पाच वर्षातील कामकाजाची पहाणी करून त्याचा अहवाल मा.प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांच्याकडे सुपूर्त केला.

यासाठी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.के. एस.चौगुले,सचिव शिवाजीराव पाटील,प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रोफेसर डॉ.बी.एन.रावण,ऍक्टिव्हिटी प्रमुख डॉ.एस.एस.कुरलीकर यांचे सहकार्य लाभले.