आ. अमल महाडिक यांनी पंकजाताई मुंडे यांना रंकाळा,पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी निधीची तरतूद करण्याचे दिले निवेदन

कोल्हापूर : कोल्हापूरचे जलवैभव असलेला रंकाळा तलाव आणि जीवनदायीनी पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. प्रदूषण मुक्तीसाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाय योजनांची गरज आहे. त्या अनुषंगाने आमदार अमल महाडिक यांनी पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन निधीची तरतूद करण्याचे निवेदन दिले.

 

 

जलचरांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी शासन कटिबद्ध असून लवकरच निधीची तरतूद करण्यात येईल असा विश्वास पंकजाताईंनी दिला.