कुंभोज (विनोद शिंगे)
खासदार धैर्यशील माने यांच्या मार्गदर्शनातून रुकडी गावातील गट नंबर 523 मधील साडेतीन एकर जागा जिल्हा चिकित्सालय यांच्या नावे वर्ग करून त्या जागेवरती प्राथमिक आरोग्य पथक उभा करण्याकरिता खासदार धैर्यशील माने तसेच प्रकाश आबिटकर आरोग्य मंत्री यांना आरोग्य पथक केंद्राकरिता 30 कोटी ची मागणीचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी रुकडी गावच्या लोकनियुक्त सरपंच राजश्री संतोष रुकडीकर, उपसरपंच मालतीताई दिलीपराव इंगळे, मा. डे. सरपंच शितल खोत ,शमुवेल लोखंडे, राजकुमार मोहिते व ग्रामपंचायत सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच दिलेल्या निवेदनाची पडताळी करून प्रथम आरोग्य पथकाचे बांधकाम लवकरात लवकर चालू करण्याचे आश्वासन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्याबद्दल व रुकडी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांनी दिलेल्या निवेदनाबद्दल सर्व स्तरातून कौतुक व समाधान व्यक्त होत आहे.