आ. अमल महाडिक यांच्या हस्ते गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिराचा शुभारंभ

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयात आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा शुभारंभ आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला.

 

 

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, गांधीनगर उपजिल्हा वसाहत रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दिलीप वाडकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. गरजू रुग्णांनी या शिबिरात तपासणी करून उपचारांचा लाभ घ्यावा असे आवाहन करत भविष्यात गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयाची सुसज्ज इमारत आणि साधनसामग्री साठी प्रयत्न करू असा विश्वास यावेळी अमल महाडिक यांनी व्यक्त केला.

🤙 9921334545