‘विकसित भारतासाठी सामाजिक समावेशन’ या विषयावर उद्या परिषद

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या वतीने उद्या, (मंगळवार, दि. २८) ‘विकसित भारतासाठी सामाजिक समावेशन’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन मुंबई विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक डॉ. रमेश कांबळे यांच्या बीजभाषणाने होणार असून अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के असतील.

 

 

 

विकसित भारतासाठीचे ध्येय गाठण्यासाठी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या घटकांना एकत्रित आणणे, त्यामध्ये वंचितांचे समावेशन करणे या अनुषंगाने विस्तृत चर्चा व जनजागृती करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. परिषदेच्या पहिल्या सत्रात ‘आरोग्य आणि समाज कल्याण’ या विषयावर डॉ. योगेश साळी व डॉ. रवींद्र श्रावस्ती, दुसऱ्या सत्रात ‘आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक नवकल्पना’ या विषयावर प्रा. प्रशांत बनसोडे तर तिसऱ्या सत्रात ‘जात, लिंग आणि सामाजिक न्याय’ या विषयावर डॉ. सुनीता सावरकर मांडणी करतील. परिषदेच्या शेवटी ‘बलुतं’ चित्रपट दाखविण्यात येईल. त्यावरील चर्चेत चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठडिया सहभागी होतील. विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्ते इत्यादींनी या परिषदेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास शिंदे व केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले आहे.

🤙 9921334545