संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “मराठी भाषा” संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सांगता कवी, गझलकार, गीतकार ‘अपूर्व राजपूत’ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी यांनी  केले. यावेळी ग्रंथालय विभाग प्रमुख सुनील नांदणीकर, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत असणारे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

उपस्थितांना मार्गदर्शन करताना राजपूत म्हणाले  महाविद्यालयीन शिक्षणासोबतच मातृभाषा “मराठीचे” जतन करणे काळाची गरज बनली आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये भाषाशैली आणि त्या भाषेचे महत्त्व आजच्या तरुण पिढीने समजून घेऊन त्यावर अभ्यास करणे आवश्यक आहे. उच्च शिक्षणाबरोबरच भाषण कौशल्य, काव्य कौशल्य आणि लेखन कौशल्य याविषयी महत्त्वाच्या टिप्स उपस्थित विद्यार्थ्यांना राजपूत यांनी देवून  त्यांच्या नावाजलेल्या  स्वरचित कवितांचे सादरीकरण केले त्या कवितांना उपस्थितानी उस्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. सुहास पाटील यांनी केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम आयोजनास  संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी  शुभेच्छा दिल्या.