मुंबई : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार मंत्रालयाच्या वतीने ‘सहकार से समृद्धी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्र येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्यातील सव्वा दोन लाख सहकारी संस्था तसेच त्यांच्याशी संलग्न सहा कोटी लोकांना शुभेच्छा याप्रसंगी दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती, धर्मातील लोकांना एकत्र करून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तिथूनच या मातीमध्ये खऱ्या अर्थाने सहकाराची बीजे रोवली गेली असल्याचे मत यासमयी व्यक्त केले.
सहकार क्षेत्राचा पाया महाराष्ट्रात घातला गेला. हा उद्योग अडचणीत असताना १० हजार कोटींचा आयकर माफ करून केंद्रीय सहकार मंत्री म्हणून अमितभाईंनी या उद्योगाला मोठा दिलासा दिला. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सहकार मंत्रालयाची निर्मिती करून अमितभाईंना त्याची जबाबदारी दिली. त्यामुळेच आज सहकारातून समृद्धी ही प्रत्यक्षात येणे शक्य झाले असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
२०१४ नंतर देशात मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटींना विशेष प्रोत्साहन देण्यात आले. त्यासाठी विशेष पोर्टल सुरू करण्यात आले असून शेतकऱ्यांना दर्जेदार बी बियाणे देणे सुरू केले आहे. राष्ट्रीय स्तरावर तीन मल्टिस्टेट सोसायट्या स्थापन केल्या असून सहकार क्षेत्र अधिक मजबूत करणे, ग्रामीण आणि कुटीर उद्योगांना बळकटी देणे, ग्रामीण महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे हे काम करणे सुरू असून येत्या पाच वर्षांत त्यात आमूलाग्र बदल झालेले दिसतील. आगामी काळात जास्तीत जास्त तरुणांना सहकार क्षेत्राकडे वळवण्याला प्रोत्साहन देणे आणि विदर्भ आणि मराठवाडा येथेही सहकाराचा विस्तार करण्याला प्राधान्य दिले जाईल असे याप्रसंगी स्पष्ट केले.
यावेळी उपमुख्यमंत्री
अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, आशिष भुताणी, राजगोपाल देवरा, पंकज बन्सल, ज्योतींद्र मेहता हे प्रशासकीय अधिकारी आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
