जिल्हा परिषद कोल्हापूर वार्षिक क्रीडा स्पर्धा अंतर्गत क्रिकेट स्पर्धा 

कोल्हापूर –
जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वतीने, दरवर्षी प्रमाणे यावर्षीही क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेची सुरुवात क्रिकेट स्पर्धे पासून झाली. पुरुष क्रिकेट स्पर्धा शास्त्री नगर येथे पार पडल्या. आज झालेल्या क्वॉटर फायनल सामन्यामध्ये प्रथम मुख्यालय विरुध्द पन्हाळा यांच्यात झाला. त्यामध्ये मुख्यालय संघाने विजय मिळविला.

 

 

त्यानंतर आजरा विरुध्द राधानगरी यांच्या मध्ये सामना झाला असून त्यामध्ये आजरा संघ विजयी झाला. तीसरा सामना भुदरगड विरुध्द शाहूवाडी यांच्यात झाला. त्यामध्ये भुदरगड संघ विजय झाला तसेच चौथा सामना कागल विरुध्द हातकणंगले असा झाला त्यामध्ये हातकणंगले संघाने विजय मिळविला.

सेमी फायनल मध्ये मुख्यालय विरुध्द आजरा यांच्यात सामना झाला, त्यामध्ये मुख्यालय संघाने सहज विजय मिळवत फायनल मध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुसरा सेमीफायनल सामना भुदरगड विरुध्द हातकणंगले असा झाला असून त्यामध्ये हातकणंगले संघाने सहज विजय मिळवला. फायनल सामना मुख्यालय विरुध्द हातकणंगले यांच्यामध्ये झाला. प्रथम फलंदाजी करत मुख्यालय संघाने सहा षटकामध्ये 73 धावांचे आव्हान ठेवले. धावसंख्याचे पाठलाग करताना हातकणंगले संघाचे पहिले तीन गडी लवकर बाद झाले. तीन षटकात 3 बाद 23 अशी बिकट परिस्थिती झाली.

शेवटच्या 3 षटकात विजयासाठी 51 धावांची गरज असताना शकील नायकवडी यांनी आक्रमक खेळ करत 17 बॉल मध्ये 39 धावा काढल्याा. अटितटीच्या सामन्यामध्ये हातकणंगले संघाने 3 व 7 विकेटस राखून विजय मिळविला. मोस्ट व्हॅल्युबल प्लेअर फलंदार 01) प्रदिप पाटील, 02) शकील नाईकवडी व गोलंदाजी मध्ये १) साताप्पा हजारे २) प्रविण पोवार होते.
स्पर्धेचे पंच म्हणून मनोज गायकवाड व प्रशांत किळूसकर यांनी कामगिरी पार पाडली व क्रिकेट नियोजन हे जिल्हा परिषदेचे क्रिकेट नियोजन कमिटी यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे क्रिकेट सामने पार पाडण्याचे नियोजन केले.