कोल्हापूर : शहरी ई गव्हर्नन्स इडेक्स 2025 (Citry E-Governance Index) मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने राज्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन पुणे या संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये ई-गव्हर्नंस यंत्रणेचा वापराबाबत अभ्यास केला जातो. यामध्ये सेवा, पारदर्शकता, उपलब्धता या तीन निकषांच्या आधारे गुण दिले आहे.
त्यांच्या या निकषानुसार राज्यातील तीन महापालिकेची ई-गव्हर्नंस यंत्रणेच्या वापराबाबत निवड केली जाते. यामध्ये पहिला क्रमांक पुणे महानगरपालिकेने प्राप्त केला असून कोल्हापूर महानगरपालिकेने राज्यात द्वितीय क्रमांक तर पिंपरी चिंचवड महापालिकेने तीसरा क्रमांक मिळविला आहे. पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन यांनी यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व 28 महानगरपालिकांचे संकेतस्थळ, त्यावरून दिले जाणाऱ्या सेवा, संकेतस्थळावरील प्रसिद्ध करण्यात आलेली अद्ययावत माहिती, मोबाईल अॅप, मोबाईल अॅपवरून दिल्या जाणा-या सेवा व माहिती, सामाजिक माध्यमांचा अभ्यास केला जातो.
नागरीकांना चांगल्या ई-गव्हर्नंस प्रणालीद्वारे ऑनलाईन सेवा देण्यासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सदरच्या सेवा ऑनलाईन देऊन महापालिकेने प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली व उप-आयुक्त साधना पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने हा द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
सन 2022 मध्ये शहरी ई गव्हर्नन्स इडेक्स (Citry E-Governence Index) मध्ये कोल्हापूर महानगरपालिका 20 व्या क्रमांकावर होती. मागील वर्षी 2023 मध्ये महापालिकेने लक्षणीय प्रगती करुन 3 रा क्रमांक पटकाविला होता. यावर्षी देखील महानगरपालिकेने कामगिरीत सातत्य राखत नागरीकांना ऑनलाईन चांगल्या सुविधा देऊन ई-गव्हर्नंसमध्ये दुसरा क्रमांक पटकाविला आहे. दि.01 जानेवारी 2024 ते 31 डिसेम्बर 2024 या एका वर्षाच्या कालावधीत शहरी ई गव्हर्नन्स इडेक्स (Citry E-Governence Index) क्रमवारीचा विचार करताना कोल्हापूर महानगरपालिकेने संकेतस्थळ व मोबाईल अॅपचा कार्यालयीन कामकाजात वापर, नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या सेवा या बाबींचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. यातून सेवा, पारदर्शकता, उपलब्धता या तीन निकषांच्या आधारे गुण दिले आहे. पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन, पुणे या संस्थेचे संकेतस्थळ http://e-governance.policyresearch.in/index.php वर सर्व महानगरपालिकांचे विस्तृत अहवाल नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.
कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ https://web.kolhapurcorporation.gov.in/ हे असून अधिकृत मोबाईल अॅप myKMC हे गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. सदर संकेतस्थळ तसेच मोबाईल अॅपवरून घरफाळा भरणे, पाणीपट्टी भरणे, जन्म/मृत्यू नोंदणी दाखल्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे, नवीन नळ जोडणीसाठी अर्ज करणे, पाणीपट्टी व घरफाळा ना-हरकत प्रमाणपत्र, विवाह नोंदणी करणे, रुग्णालय नोंदणी व नूतनीकरण करणे, व्यावसायिक परवाना नोंदणी व नूतनीकरण करणे, अग्निशमन विभागाकडून आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे, तसेच विविध सेवांचे ऑनलाइन पेमेंट करणे, व इतर विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच इतर नवीन सेवा देखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असून नागरिकांसाठी जास्तीत जास्त सेवा ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून देण्यात येणार असलेचे उप-आयुक्त साधना पाटील यांनी सांगितले आहे.