कोल्हापूर: खंडपीठ आंदोलनाबाबत अवेरनेस व माहिती देणे, ज्युनिअर वकीलांकरिता शिकाऊ शिष्यवृत्ती बाबत माहिती देणे
ज्युनिअर वकिलांना न्यायालयीन कामकाजात येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा करण्यात आली.
अध्यक्ष ॲड. सर्जेराव खोत यांनी प्रास्ताविक करून वरील विषयांवर सभेस मार्गदर्शन केले. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन होणे बाबत संपूर्ण कायदेशीर परिस्थिती असताना देखील त्याबाबत शासन स्तरावर उदासीनता आहे. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाने देखील कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय मागील दहा वर्षात घेतला नाही.
तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय मोहित शहा यांनी अहवाल दिलेला असताना देखील अद्याप घेतलेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाचे परिक्रमा खंडपीठ कोल्हापूर मध्ये स्थापन होणे ही काळाची गरज आहे असे वक्तव्य जाहीरपणे सुप्रीम कोर्टाचे आदरणीय न्यायाधीश भूषण गवई तसेच ते सुप्रीम कोर्टाचे होणारे प्रमुख न्यायाधीश असून त्यांनी वेळोवेळी सभेमध्ये उद्गार काढले.
स्वागत सेक्रेटरी ॲड.निशिकांत पाटोळे यांनी केले तसेच आभार सेक्रेटरी ॲड . राजू ओतारी यांनी केले. यावेळी सोनाली शेठ, सागर घोरपडे, रोहिणी भोसले,मीना पोतदार, सरिता घोरपडे, श्रद्धा कुलकर्णी, उपस्थित होते.