पन्हाळा –शाहुपुरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी सुरेश शामराव पाटील यांनी पत्रकार यांचे अपहरण करून मारहाण केली. यांच्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा प्रजासत्ताक दिनाच्या दिनी पोलिस परिक्षेत्र कार्यालय (आय.जी ऑफिस) कोल्हापूर येथे अमरण उपोषण करण्याचा इशारा युवा संघर्ष सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण तांदळे यांनी व कार्यकर्त्यांनी दिला आहे.
शाहूपुरी पोलिस स्टेशन चे कर्मचारी सुरेश शामराव पाटील फुलेवाडी यांनी पत्रकार पी.बी किरंगी यांना मारहाण, व शासकीय गाडीतून अपहरण केले,कोंडून ठेवून, दहशत माजवून पोलिस खात्याचा गैर वापर करून त्यांच्या कडून खंडणी स्वरूपात चेक लिहून घेतले. ते न्यायालयात दाखल केले आहेत.सदर प्रकार २० ऑक्टोबर २०२२ रोजी घडला असून संबंधित विभागाला संबंधित किरंगी यांनी
तक्रार अर्ज देऊनही पोलिस प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. पाटील शासनाचे कर्मचारी आहेत की जावाई आहेत.
यामुळे त्यांच्या वरती अद्याप कारवाई केली नसल्याने युवा लहुजी संघर्ष संघटनेच्या वतीने कोल्हापूर पोलीस परिक्षेत्र कार्यालया समोर प्रजासत्ताक दिनी अमरण उपोषण करणार असल्याचे लक्ष्मण तांदळे यांनी सांगितले. २६ जानेवारी रोजी आमरण उपोषणा दिनी काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी पोलिस प्रशासनावर राहील.