कुंभोज परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद अवस्थेत !

कुंभोज(विनोद शिंगे)

कुंभोज ग्रामपंचायतच्या वतीने कुंभोज सह परिसरात तसेच महत्त्वाच्या चौकात लावण्यात आलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद अवस्थेत असल्याचे चित्र दिसत असून प्रत्येक वर्षी लाखोच्या घरात सदर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर खरेदी व देखभाल दुरुस्ती खर्च केला जातो. परंतु त्याची देखभाल दुरुस्ती ही सदर सीसीटीव्ही कॅमेरा बसवणाऱ्या ठेकेदाराकडे असूनही ग्रामपंचायत त्याकडे का दुर्लक्ष करत आहे. असा प्रश्न सध्या कुंभोज परिसरातील ग्रामस्थातून व्यक्त होत आहे.

 

 

 

 

कुंभोज येथे दीपक चौक ,आंबेडकर चौक ,मसुदी कट्टा ,एसटी स्टँड परिसरात लावण्यात आलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सध्या केवळ खांबाला अडकून असल्याचे चित्र दिसत असून, सदर बंद असलेल्या कॅमेऱ्या परिसरात झालेल्या चोऱ्या किंवा चोरट्यांना पकडणे अवघड झाले असून बंद अवस्थेत असलेली सीसीटीव्ही ही कुंभोज ग्रामस्थांची फसवणूक करत असल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या काही वर्षापासून कुंभोज ग्रामपंचायतच्या वतीने सी सीटीव्ही प्रकल्प राबविण्यात आला. सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या प्रकल्पांतर्गत चौकाचौकात आणि प्रमुख रस्त्यावर २०पेक्षा जास्त सीसीटीव्हींचे जाळे विणण्यात आले. मात्र गेले काही महिने सर्वच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून ते चौकात लटकले आहेत. गुन्हेगारीवर नियंत्रण आणि गुन्ह्यांची उकल यासाठी त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने तब्बल लाखो रुपयाचा प्रकल्प खड्डयात गेल्याची स्थिती आहे. परिणामी कुंभोज गाव असुरक्षित बनत चालले आहे.

कुंभोज परिसरात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या चोरी करून लाखोंचा ऐवज चोरटे लंपास करत आहे. गुंडाराज स्थिती निर्माण होऊन भर गर्दीच्या ठिकाणी बाजार पेठेत मोबाईल व सोने चोरीचे प्रमाण वाढले आहे. बऱ्याच वेळा काही खाजगी सीसीटीव्ही कॅमेरा चोरटे कैद होऊनही पोलिसात गुन्हा नोंद करताना अप्पष्टपणा असल्यामुळे ओळखता येत नाही असे प्रत्युत्तर दिले जाते त्यामुळे कुंभोज परिसरात वर्षाला लाखो रुपये खर्चून बसवण्यात येणारे कॅमेरे काय कामाचे जर त्यांचा वापर नसेल तर ग्रामपंचायतीने सदर प्रकल्पावर करण्यात येणारा खर्च बंद करावा अशी मागणी नागरिकांच्यातून सध्या जोर धरत आहे.

🤙 9921334545