विवेकानंद कॉलेजची विद्यार्थीनी समिधाची प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड

कोल्हापूर :  दिल्ली येथे दि. 26 व 27 जानेवारी 2025 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित होणाऱ्या परेड व पंतप्रधान रॅलीसाठी विवेकानंद कॉलेजची एन.सी.सी. छात्र सिनिअर अंडर ऑफिसर समिधा घुगरे (बी.कॉम.भाग 2) हिची निवड झाली आहे.  या परेडसाठी तिचा दिल्ली येथे दिनांक 1 जानेवारी 2025 पासून सराव सुरु आहे.  कु. समिधा ही 6 महाराष्ट्र गर्ल्स एन सी सी बटालियनमधून निवड झालेली एकमेव छात्र आहे.

 

 

 

या निवडीबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य मा. अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी मा. प्राचार्या सौ शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी अभिनंदन केले.

वरील छात्रास 6 महाराष्ट्र बटालियनचे कर्नल संधान मिश्रा, मेजर सुनिता भोसले, लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा, प्रा. सनी काळे, प्रबंधक श्री. रघुनाथ जोग यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.