कुंभोज (विनोद शिंगे)
शालेय जीवनातील शैक्षणिक सहल म्हणजे सर्वांचीच अविस्मरणीय आठवण. ह्या सहलीसाठी लागणारी फी जमा करण्यासाठी तगादा लावणारे शिक्षकही आपल्या सर्वांना आठवतात. मात्र, रुकडी येथील शिक्षिकांनी स्व:खर्चातून सहावीच्या विद्यार्थ्यांची मोफत सहल घेऊन जात त्यांना कागल येथील पाझर तलाव, धबधबा, लेझर लाईट शो व बोटिंग आशा स्थळांची अनोखी सफर घडविली.
सातत्याने 15 वर्ष शैक्षणिक सहल तीही विना फी शाळेची सहल गेली मात्र तीही विना फी असे ऐकले तर कदाचित अतिशयोक्ती किंवा नवल वाटेल. पण हे खरे असून याबाबतची माहिती अशी, रुकडी येथील श्री कै.बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट संचलित श्री कै काकासाहेब माने हायस्कूल चे एक शिक्षक हे गेली सातत्याने 15 वर्ष अशा मोफत सहलीचे आयोजन करतात,
सहलीचा प्रवास खर्च सर्व खर्च सरांच्या मार्फतच केला जातो.