देश एकसंघ ठेवण्यात संविधानाची महत्त्वाची भूमिका : आ. अमल महाडिक

कोल्हापूर : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हर घर संविधान उपक्रमांतर्गत मिणचे इथल्या आदर्श गुरुकुल अकॅडमी मध्ये संविधान वाचन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये तब्बल 1111 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. संविधान वाचन सप्ताहाचा शुभारंभ आमदार अमल महाडिक आणि आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आला.

 

 

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संविधानाचे महत्त्व विशद केले. भारतीय संविधानाने प्रत्येकाला दिलेले अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव आपण ठेवली पाहिजे. देश एकसंघ ठेवण्यात संविधानाची महत्त्वाची भूमिका आहे असे विचार यावेळी मांडले. या कार्यक्रमाला आदर्श गुरुकुल अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ.दत्तात्रय घुगरे, उपप्राचार्य मनोहर परीट, मुख्याध्यापिका महानंदा घुगरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.