अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक

कोल्हापूर –कोल्हापूर- एका अल्पवयीन मुलीला  प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तिला जबरदस्तीने नशील्या  गोळ्या चारल्याचेही पीडितेने आपल्या  फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी करवीर पोलिसांनी अनिकेत साताप्पा हेरवाडकर (वय २३, रा. रायगड कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, कोल्हापूर) यास अटक केली आहे.

 

 

 

पीडित युवती अल्पवयीन असून तिचे  शिक्षण चालू आहे . पीडित युवती व संशयित अनिकेत यांची  वर्षभरापूर्वी सोशल मीडियावरून ओळख झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात होते. सोशल मीडियावरून चॅटिंग करत होते. अनिकेत याने युवतीबरोबर लग्न करण्याची तयारी दर्शवली.”