जिल्ह्यात अनधिकृतपणे फिरणाऱ्या वाहनांची तपासणी व्हावी: युवासेना (उबाठा)कडून जिल्हा पोलिसांना निवेदन

कोल्हापूर : पोलीस आर्मी महाराष्ट्र शासन प्रेस या नावाने जिल्ह्यात अनाधिकृतपणे फिरणाऱ्या वाहनांची तपासणी करून शहर वाहतूक शाखा व पोलीस ठाणे यांच्या कडून कारवाई करावी या साठी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेकडून निवेदनाद्वारे डीवायएसपी व जिल्हाप्रमुख पोलिसांना मागणी करण्यात आली.

 

 

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासन अथवा व्हीआयपी, PRESS, आर्मी, या नावाने फिरणाऱ्या ज्या ज्या गाड्या आहेत या मध्ये बसलेले व्यक्ती तीच आहे का? याची एकदा सत्वरपणे व अचानक पोलीस प्रमुखांनी तपासणी करावी, अन्यचा शिवसेना युवासेना आपल्या पद्धतीने अशा गाड्या अडवून याची तपासणी करेल. यापुढे होणाऱ्या जबाबदारीस केवळ प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा शिवसेन युवा सेनेकडून करण्यात आला आहे

यावेळी चैतन्य देशपांडे, सनराज शिंदे रोहित वेठे, अजय घाडगे सुमित मेळवकी युवराज मोरे ओंकार मंडलिक शैलेंद्र नलवडे आदी उपस्थित होते.