आ. राहुल आवाडेंच्या हस्ते इचलकरंजीत विकास कामाचा शुभारंभ

कोल्हापूर : आमदार राहुल आवाडे यांच्या अथक प्रयत्नातून अष्टविनायक कॉलनी, इचलकरंजी येथील गटर्स बसविण्याच्या कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या महत्त्वपूर्ण कार्याचा प्रारंभ आ. राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून स्वागत केले. या कामामुळे परिसरातील स्वच्छता व जलनिकासी व्यवस्थेत सुधारणा होऊन नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या यशस्वी उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही राहुल आवाडे यांनी दिली.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, भाजपाचे अध्यक्ष अमृत भोसले, प्रकाश पाटील, पापालाल मुजावर, नंदू पाटील, राहुल घाट, किशोर पाटील, प्रमोद बचाटे, अनिकेत पाटील, सागर कम्मे, तोफीक मुजावर, शशिकांत नेजे, तानाजी कोकितकर, अमोल जाधव, मल्हारी सोलगे, शिवाजी पवार, सीमा कमते घाडगे साहेब, महानगरपालिकेचे बेक साहेब, राजू दरीबे, विजय लवटे, छोटू चौगुले, आसिफ मुजावर, डॉक्टर मुजावर, आनंदा पाटील, सदाशिव मिठारी, चांद नदाफ, यांच्यासह भागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.