कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या दीक्षान्त समारंभाचे विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ युट्यूब वाहिनीवरुन थेट प्रक्षेपण करण्यात आले. या समारंभात सुमारे २००० जण ठिकठिकाणांहून सहभागी झाले.
या व्यतिरिक्त विविध प्रसारमाध्यमे तसेच डिजीटल मीडिया यांनीही आपापल्या युट्यूब, फेसबुक, एक्स इत्यादी मंचावरुन या समारंभाचे सहक्षेपण केले. त्यावरुनही शेकडो दर्शकांनी या कार्यक्रमात ऑनलाईन सहभाग दर्शविला.