विद्यार्थ्यांनी स्वतः करीयर निवडावे – योगेश्वर पाटील

सातारा – ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार.सातारा जिल्ह्यातील लाल बहादूर शास्त्री कॉलेज यांच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे योगेश्वर पाटील कोतोलीकर हे होते.

 

 

 

स्वामी विवेकानंद संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शिक्षण समूहाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं. लाल बहादूर शास्त्री कॉलेज चे माजी.प्राचार्य डॉ .आर.व्ही.शेजवळ शिवाजी विद्यापीठ कौशिंल सद्श सातारा केंद्र प्रमुख अध्यक्ष स्थानी होते.प्रमुख उपस्थित सुनील शिंदे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे सदस्य पुणे यांच्या वतीने विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ. संजय पाटील, योगेश्वर संजय पाटील कोतोलीकर, राम नाईक, सोनदेव बेलेकर कळेकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.