कोल्हापूर : महालक्ष्मी तिर्थक्षेत्र विकास कामाअंतर्गत सरस्वती टॉकीज जवळील अंतीम टप्प्यात सुरू असलेल्या पार्किंगच्या कामाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सकाळी 11 वाजता पाहणी केली. यावेळी त्यांनी सदरचे पार्किंग चालू करण्याच्या अनुषंगाने अग्शिनमन सुविधा करुन एक महिन्यात पार्किंग सुरु करण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या.
यानंतर प्रशासकांनी रंकाळा टॉवर ए वॉर्ड सिसनं.1644 मधील सर्व समावेक्षक आरक्षणाच्या माध्यमातून महापालिकेच्या ताब्यात आलेली पार्किंगच्या जागेवर आठवडयात पार्किंग सुरु करण्याच्या सूचना इस्टेट ऑफिसर यांना दिल्या. या पार्किगच्या ठिकाणी आवश्यक ती लाईटची व्यवस्था व गाडया आत येणा-या प्रवेशद्वारजवळ लोखंडी जाळी करण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या. तसेच या संपुर्ण जागेची स्वच्छता आजच्या आज करण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरिक्षक यांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, महादेव फुलारी, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार आदी उपस्थित होते.