कुंभोज (विनोद शिंगे)
हातकणंगले तालुक्यातील टोप परिसरातील क्रशर व्यावसायीकांवर गेल्या दोन दिवसापासून महसूल विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. ट्रेडींग लायसन्स आणि विविध कारणांवरून 45 क्रशर सील केल्या असून या कारवाईबाबत परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
परिसरात दगडखाणी आणि क्रशर व्यवसाय मोठया प्रमाणात केला जातो. यामध्ये शेकडो वाहने, मजूर कार्यरत असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. या परिसरातून तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागातील खासगी आणि शासकीय बांधकाम प्रकल्पासाठी गौनखनिजासह विविध प्रकारचे बांधकाम साहित्य पुरविले जाते. मात्र, या कारवाईमुळे आता कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.