मुंबई :सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा एक्सवरपोस्ट करत केला आहे. ते म्हणतात , सैफ अली खानवर एकूण सहा वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे. त्यातील दोन वार हे गंभीर स्वरुपाचे असल्याचे समजते. एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मनक्यावर गंभीर दुखापत झाली आहे.
हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता, वार हा जिवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सैफ अली खान हा भारतामधील चौथ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणार्या पद्श्री पुरस्काराने सन्मानित आहे, हे विशेष…असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.
सैफ अली खानवर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव तैमुर ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते. ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे? या दिशेने ही तपास होणे आवश्यक आहे.