कोल्हापूर : मतदार संघातील विविध प्रश्नांसंदर्भात आमदार चंद्रदीप नरके यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली.
यावेळी
1. संभाजीनगर बस स्थानकाला 56 आणि गगनबावडा बस स्थानकला 16 अशा एकूण 72 एस. टी बसेस मिळाव्यात.
2. मतदारसंघातील विविध गावांमध्ये पिक अप शेड उभरावे
3. गगनबावडा आगार आणि अद्ययावत बस स्थानक बांधणेसाठी निधी उपलब्ध करावा.
4. शिये ता. करवीर हे गाव परिवहन कार्यालय (RTO) ला जोडावे.
आदी प्रमुख मागणीचे निवेदन प्रताप सरनाईक यांना दिले. त्यांनी या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.