विवेकानंद संस्थेचे दीपस्तंभ  मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या कार्याचा आढावा

कोल्हापूर : शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी स्थापन केलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही एक महाराष्ट्रातील अग्रमानांकित शिक्षण संस्था आहे.  या शिक्षणसंस्थेमुळे अनेक खेडयापाडयातील मुलांच्या शिक्षणाची सोय झाली आहे.  आज या संस्थेचा वटवृक्ष होऊन  406 शाखा महाराष्ट्र व कर्नाटकात  ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत  आहेत. 

 

 

 

अशा या प्रसिध्द संस्थेची धुरा मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे  आपल्या गुरुदेव कार्यकर्त्यांच्या साथीने समर्थपणे सांभाळीत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संस्थेच्या विविध शाखांमध्ये एम.बी.ए., एम.सी.ए., लॉ कॉलेज, असे अनेक नवनवीन अभ्यासक्रम सुरु झालेले आहेत. विद्यार्थ्यांच्या सोईसाठी चार नवीन बसेसची सोयही संस्थेमार्फत करण्यात आली आहे.

आजही संस्थेच्या  गुरुदेव कार्यकर्त्यांमध्ये  त्यांच्याबद्दल  आदरयुक्त भीती आहे. कारण त्यांच्या समस्या जाणून घेऊन कर्मचारी वर्गापासून विद्यार्थ्यांपर्यंत अडचणींचे निवारण करणे, विद्यार्थ्याना काही अडचणी येऊ नयेत म्हणून धडपडणारे साहेब साठी इतरांसाठी संस्थाप्रमुख असले तरी गुरुदेव कार्यकर्त्यांसाठी ते कुटुंब प्रमुख आहेत. त्यांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळेच त्याची प्रतिष्ठा व लोकप्रियता आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मा.प्राचार्या  सौ शुभांगी गावडे या संस्थेची सेक्रेटरी पदाची समर्थपणे  सांभाळत आहेत. तर मा.कौस्तुभ गावडे हे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. साहेबांच्या शैक्षणिक कार्य
शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शिक्षण क्षेत्रातील ज्ञान प्रसाराचे कार्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करावा अशी साहेबांच्या बरोबरच आम्हा सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे कारण त्यामुळे त्यांच्या कार्याची सर्व समाजासमोर येईल असे वाटते. मा.अभयकुमार साहेबांच्या वाढदिवसानिमित ज्ञानशिदोरी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वाचण्यायोग्य पुस्तके एकत्र जमा करुन गरीब विद्यार्थ्यांना वाटणे, रक्तदान शिबीर असे उपक्रम होणार आहेत. यावेळी ज्ञान शिदोरी समारंभात प्रसिध्द लेखक, व्याख्याते व विचारवंत डॉ. अच्युत गोडबोले यांचे विशेष व्याख्यान आयोजित करणेत आले आहे. बापूजींच्या शिकवणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करणाऱ्या साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

शब्दांकन हितेंद्र साळुंखे

🤙 9921334545