पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय नौदलाच्या 3 युद्धनौकाचा राष्टार्पण सोहळा 

मुंबई : देशाचे  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्तेभारतीय नौदलाच्या वतीने नव्याने तयार करण्यात आलेल्या आयएनएस निलगिरी, आयएनएस सुरत या युद्धनौका तसेच आयएनएस वाघशीर या पाणबुडीचा राष्टार्पण सोहळा आज संपन्न झाला. यावेळी उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरलो यांचा सार्थ अभिमान आहे.

 

 

 

 

भारतात पहिल्यांदाच तीन सामरिक नौकांचे एकत्रित जलावतरण झाले असून याद्वारे देशाच्या सामरिक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. या तिन्ही लढाऊ नौकांची बांधणी ही संपूर्णपणे भारतीय बनावटीची असून हीदेखील एक मोठी उपलब्धी आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाची लष्करी क्षमता वाढत असून देश अधिक शस्त्रसज्ज आणि बलशाली होत आहे.

यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान तसेच तिन्ही दलांचे प्रमुख आणि माझगाव डॉक मधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545