विवेकानंद कॉलेजमध्ये डॉ. अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान

कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य  अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस ज्ञानशिदोरी दिन म्हणून साजरा होत आहे. 

 

त्यानिमित्ताने जगप्रसिध्द व्याख्याते व लेखक डॉ.अच्युत गोडबोले यांचे  माझा लेखन प्रवास आणि आजचे  शिक्षण  या विषयावर शुक्रवार दि. 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता  व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे आहेत.

याप्रसंगी संस्थेच्या सेक्रेटरी मा. प्राचार्या सौ शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, कोल्हापूर विभागप्रमुख मा.श्रीराम साळुंखे, संस्था पदाधिकारी व हितचिंतक , गुरुदेव कार्यकर्ते यांची  उपस्थिती आहे.   तसेच या दिवशी महाविद्यालयाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करणेत आले आहे.  तरी सर्वानी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा  असे आवाहन विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी केले आहे.

🤙 9921334545