कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील रुकडी येथे होणाऱ्या जैन बांधवांच्या अष्टपाद पंचकल्याण महोत्सवाच्या निमित्ताने आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या समवेत खासदार धैर्यशील माने यांनी बैठक घेऊन चर्चा केली.
हा महोत्सव यशस्वी करण्याच्या अनुषंगाने कोणकोणत्या उपाय योजना राबवता येतील, प्रशासनाकडून कोणत्या पद्धतीचे सहकार्य हवे या संदर्भात चर्चा केली.
यावेळी आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू ) व सर्व ग्रामस्थ तसेच जैन बांधव आदी उपस्थित होते..