कोल्हापूर : करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या 350व्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या चित्ररथाचा उद्घाटन समारंभ सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार साहेब यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. याप्रसंगी कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती व राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ ,खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.
करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या 350 व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने महाराणी ताराराणी यांच्या कार्यावर आधारित हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून महाराणी ताराराणी यांच्या शौर्याची यशोगाथा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे. ही सर्व कोल्हापूरकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. या रथाच्या माध्यमातून महाराणी ताराराणीचे जीवन चरित्र सर्वांनी जाणून घ्यावे, असे आवाहन यावेळी उपस्थितांना केले.
यावेळी जयसिंगराव पवार, विनोद डिग्रजकर,अमय देशपांडे यांच्यासह सांस्कृतिक विभागाचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.